*रावेर मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन — 14 प्रकरणांमध्ये 18,93,130 रुपयांची वसुली* .. (रावेर / शेख शरीफ)रावेर, 14 मार्च 2026 — महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आणि तालुका विधी सेवा समिती व रावेर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतचा आयोजन करण्यात आले. या अदालतीस दिवाणी व फौजदारी न्यायालय रावेर परिसरात सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून न्यायाधीश एस.बी. तिवारी साहेब व न्यायाधीश व्ही. व्ही. जटाळ साहेब उपस्थित होते. रावेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. धनराज ई. पाटील, उपाध्यक्ष ॲड. तुषार पी. चौधरी, सचिव ॲड. के. बी. खान, सहसचिव ॲड. जितेंद्र दांडगे आणि अनेक अन्य वकील उपस्थित होते. त्यात ॲड. मुजाहिद शेख, ॲड. विपिन गडे, ॲड. प्रमोद विचवे, ॲड. सुभाष धुंदले, ॲड. जावेद शेख, ॲड. सलीम तडवी, ॲड. के. डी. पाटील आणि इतर वकील व कोर्ट कर्मचारी यांचा समावेश होता.या लोक अदालतीत एकूण 14 प्रकरणांमध्ये निकाली निघाले असून, 18,93,130 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी महत्त्वाची सुविधा मिळाली असून, लोकांना त्यांच्या विवादांचे समाधान जलद आणि सक्षम पद्धतीने प्राप्त झाले.रावेरच्या न्यायालयात झालेल्या या अदालतीने न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी व वेळेवर केली आहे, तसेच लोक अदालत कार्यकमाची महत्त्वाची भूमिका उचलली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0