*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंददायी शनिवार साजरा.** (मानवत / अनिल चव्हाण.*)—————————— येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आज आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे उपमूख्याध्यापक विश्वनाथ बुधवत, धनंजय गरूड, सदाशिवराव होगे पाटील, केलासचंद्र सारडा यांच्या सह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. विविध उपक्रमाबरोबरच आज दिनांक 14 मार्च शनिवार रोजी सर्वांसमक्ष तक्रार पेटी उघडण्यात आली. यावेळी तक्रार निरंक निघाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमामुळे , शाळेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होत असल्याचे दिसून येत आहे.शैक्षणिक दर्जा उंचवावा यासाठी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे आदेश दिल्यामूळे त्यांची अमलबजावणी होत असल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये नवचेतन्य निर्माण होत आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0