सगरोळी ते शिंगणापूर महादेव काठी,पदयात्रा 300 वर्षाची परंपरा. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील 300 वर्षाची परंपरा कायम ठेवत, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी महादेव काठी पदयात्रा सगरोळी येथून, दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी महाआरती व सर्व गावकऱ्यांनी आशीर्वाद घेऊन हार हार महादेव च्या घोषणा देत निघाली आहे बिलोली,तालुक्यातील सगरोळी हे मोठे गाव असून या गावांमध्ये याठिकाणी शिक्षण, व धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात, यातच महादेव काठी पदयात्रा मोठ्या उत्साहात निघाली आहे ,महादेव काठी सोबत हजारो शिव भक्त पदयात्रा करतात,पंचकोशीतील अनेक खेडेपाडीतील भक्त सुद्धा महादेव काठी शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी निघालेली प्रचंड अशी लोकसंख्या, दिसायला लागली महादेव काठी पदयात्रा हे दिनांक 13 /3/2026 रोजी सगरोळी येथून निघाली असून अनेक, खेडोपाडी व मोठे शहर करत,दौलतापूर,हिप्परगा थडी,शहापूर,गोजेगाव, हाळणी,शेळकीं शेकापूर, भाकलीवाडी,जावळी, करजखेड फाटा,सारोळा,दहीतना, उपळाई खुर्द,टेंभुर्णी, बावडा पार्वती पायरी, नातेपुते, व दिनांक 27/03/2026 रोजी, शिखर शिंगणापूर येथे पोहोचते,व प्रतीच्या नंतर सगरोळी, येथे मोठ्या उत्साहामध्ये महादेव काठी यात्रा भरवल्या जाते, तीन दिवसाची यात्रा मोठ्या उत्साहात,सगरोळी येथील गावकरी व पंचक्रोशीतील गावकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात.
byमीडीया पोलीस टाईम
-
0