घरकुल लाभार्थ्यांचे तातडीने हप्ते जमा करा: (पिंजारी माहेमूद (समाज सेवक)पिंजारी & तालुका } प्रतिनिधी देगलूर) देगलूर. महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गरजु लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल लाभार्थ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अघापही रोजगाराचे पैसे बॅक खात्यात जमा झालेले नाही रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास कोट्यवधी रुपये मंजुर होऊनही लाभार्थ्यांना कोणताही याचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्याच बरोबर अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी काढुन घरकुलाच्या जोत्याचे बांधकाम पूर्ण केले आहेत त्यांचे हप्ते मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहेत.जसेतसे चौकट लेवल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे जिओ टाॅकीग होवूनही जवळपास दोन ते तीन महिन्यांनंतरहि घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना हि कागदावरच नियमित असल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक घरकुल लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार हि योजना राबवित आहे मात्र या योजनेला आता कुठेतरी जंग लागल्याचे दिसून येत आहे.घरकुल योजनेच्या अल्पशा निधीमध्ये घर बांधने शक्य नाही परंतु आपणास घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी, व्याज दराने सोने,चांदी काढून घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहेत मात्र शासनाकडून वितरीत होणाऱ्या निधीत विलंब होत असल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन नाराजीचे सूर छेडले जात आहे घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते कधी येणार म्हणून रोज रोज पंचायत समिती तर कधीं कधीं जिल्हा परिषदेच्या पायऱ्या नागरिकांना जिझवाव्या लागत आहेत त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असुन केंद्र सरकारने व राज्यसरकारने तातडीने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ते वितरीत करण्याची मागणी (समाज सेवक) पिंजारी माहेमूद वाकान यांनी केली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0