*सलग पाच वर्षे कॉलेज टॉपर ठरला एहतेशाम इब्राहिम बख्श*यशवंत महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात सन्मान*हिंगणघाट-* येथील यशवंत महाविद्यालय च्या विधी विभागातील विद्यार्थी एहतेशाम इब्राहिम बख्श याने पाच वर्षांच्या एल.एल.बी. अभ्यासक्रमात यंदाही आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, त्याने सलग पाचही वर्षे कॉलेज टॉपर राहण्याचा मान मिळवून एक उल्लेखनीय कीर्तिमान प्रस्थापित केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात संस्था अध्यक्ष समीर देशमुख यांच्या हस्ते एहतेशाम यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी सोमन, महाविद्यालयाचे प्राचार्य ठाकरे सर, संस्थेचे संचालक शशांक घोडमारे, प्रा. सिंघम मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.एहतेशाम हा हिंगणघाट येथील प्रसिद्ध वकील अॅड. इब्राहिम हबीब बख्श यांचा सुपुत्र असून, आपल्या या यशाचे श्रेय त्याने आई-वडील आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.त्याच्या या यशाबद्दल शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक व चाहत्यांकडून त्याचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0