दिनांक.१६/३/२०२६, ला दुपारी १२, वाजता वेळा येथे “संवाद उपक्रम" अंतर्गत बैठक संपन्न...................................... वेळा (ता. हिंगणघाट) : महाराष्ट्र शासन व पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा यांच्या निर्देशानुसार “संवाद उपक्रम” अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, वेळा येथे गाव पातळीवरील बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. अनमोल फुलझेले (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा वेळा), श्री. चंदू तपासे (ग्रामसेवक), श्री. दीपक वैरागडे (वनरक्षक), श्री. पंकज चौधरी (कृषी सहाय्यक), श्री. आशिष मेश्राम (महावितरण – J.E.), श्री. सतीशभाऊ सायंकार (सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, भा ज पा), श्री. चंद्रभानजी सायंकार (माजी ग्रामसेवक), श्री. तुकारामजी सायंकार (ज्येष्ठ नागरिक), श्री. मनोज आसोले (शिक्षक – जि.प. शाळा), श्री. आसिफ हुसैन (भाजपा - अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष) तसेच श्री. अमीन अहमद (पोलीस पाटील) उपस्थित होते.बैठकीत नागरिकांनी गावातील विविध समस्या व सूचना मांडल्या. त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.अनिल राऊत साहेब यांचे मनोगत विशेष महत्त्वाचे ठरले. त्यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच सायबर गुन्हे, वाहतूक नियम व सामाजिक सलोखा याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास गावातील इतर मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व समन्वय ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0