(जाकीर तडवी) - गॅस भाववाढ सह काळा बाजार रोखण्यासाठी पाचोरा कॉग्रेस ने आक्रमक भूमिका घेवुन तात्काळ तहसीलदार यांनी कारवाई चे आदेश दिलेपाचोरा तालुक्यातील व शहरातील गॅसचा काळाबाजार सह केद्र सरकार ने भाववाढ केली याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार यांच्या सुचने वरुन आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, जिल्हा चिटणीस शेख इरफान शेख मन्यार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख युवक कॉग्रेस चे संदीप पाटील, एस सी सेल चे शंकर सोनवणे, प्रवीण पाटील, अण्णा पाटील, ओबीसी सेल चे चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, प्रशांत पाटील, राहुल मराठे, दिलदार पठाण, आदी उपस्थित होते.

