*सुनिल शेट्टी { आण्णा } यांची ईद निमित्त सदिच्छा भेट. *अनिल चव्हाण / मानवत.———————————पवित्र रमजान ईद सणा निमित्त मानवत येथे सुनील शेट्टी (अन्ना) यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. *[] पत्रकार तथा युवानेते मुस्तखीम बेलदार यांच्या वतीने आण्णा यांचा यथोचित सत्कार []*मुंबई येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक सुनील शेट्टी (अन्ना) यांनी रमजान ईद निमित्त मानवत येथे *राज बेलदार संघटनेचे राज्य अध्यक्ष मुस्तखीम बेलदार* यांची रमजान ईद निमित्त सदिच्छा भेट घेतली. या आगमना वेळी मानवत शहरातील स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी पत्रकार तथा युवानेते मा. मुस्तखीम बेलदार साहेब यांच्या वतीने मा. सुनीलजी शेट्टी (अन्ना) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दोन्ही मान्यवरां मध्ये सामाजिक बांधिलकी, समाजातील विविध विकास प्रश्न व विकासात्मक उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.यावेळी कार्यक्रमास गेवराई येथील मा. जिल्हा परिषद सदस्य शेख रहीम साहेब, मानवत येथील उद्योजक माजेद पठाण, समाजसेवक एकबाल राज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या भेटीमुळे मानवत शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील ऐक्य व सलोखा अधिक दृढ होण्यास हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0

