पवित्र रमजान महिण्यातील अलीशा नाज हिचा पहिला रोजा संपन्न.* { अनिल चव्हाण / मानवत. }——————————मानवत शहरातील बांगड प्लॉट गालीब नगर परिसरातील रहिवासी मोहम्मद मुजाहेद यांची मुलगी, अल्हाज मूफ्ती मोहम्मद इसाक साहाब कास्मी यांची नात *अलीशा नाज* वय ७ वर्ष हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीरित्या दि. १५ मार्च रविवार रोजी पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्बल १३ तास अन्न व पाणी न घेता तिने श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण घालून दिले. इतक्या लहान वयात पहिलाच रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोजा पूर्ण केल्या नंतर कुटुंबीयांनी तिचे कौतूक करून अभिनंदन केले. प्रोत्साहन दिले नातेवाई यांनीही *अलीशा नाज* हिचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या.अलीशा नाज हिच्या पहिल्या रोजामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. लहान वयात धार्मिक कर्तव्याची जाणीव ठेवून हे दाखवलेला संयम इतर मुलींसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. रमजान महिन्यात रोजा ठेवण्यामागील उद्देश केवळ उपवास नसून आत्मसंयम, दानधर्म आणि प्रार्थना यांद्वारे आध्यात्मिक उन्नती साधणे हा आहे.अलीशा नाज ने पूर्ण केलेला हा पहिला रोजा तिच्या आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. मुस्लिम समाजाचा दि.१९ फेब्रुवारीपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असून या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवून अल्लाहची उपासना करतात.आत्मशुद्धी, संयम आणि त्याग यांचा संदेश देणाऱ्या या पवित्र महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे.***

पवित्र रमजान महिण्यातील अलीशा नाज हिचा पहिला रोजा संपन्न.*                                                                                       
Previous Post Next Post