पातूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर प्रशासनाची कारवाई*; (पातूर (प्रतिनिधी): घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी तहसील प्रशासनाने पातूर शहरात व्यापक तपासणी मोहीम राबवली. ही कारवाई १३ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला तसेच तहसीलदार पातूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.निरीक्षण अधिकारी शीतल मोरखडे तसेच कर्मचारी पराग खंडारे आणि अक्षय गोरे यांच्या पथकाने पातूर शहरातील विविध हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाश्ता केंद्रांवर छापेमारी केली. या दरम्यान एकूण १९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान योगेश्वर भोजनालय, सिदाजी महाराज टी सेंटर तसेच गावरान गुळाचा चहा या चार आस्थापनांमध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व्यावसायिक कामासाठी अवैधरित्या वापरले जात असल्याचे आढळून आले.प्रशासनाने तत्काळ कारवाई करत या आस्थापनांमधील घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले असून पुढील आदेशापर्यंत ते मनात्मा इंडेन गॅस एजन्सी, पातूर यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहेत.घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर हा नियमांच्या विरोधात असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले असून अशा प्रकारच्या प्रकरणांवर पुढेही कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व भोजनालय चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0