हालाखीच्या परिस्थितीवर मात करून गुरूदेव सेलोरे यांनी गाठला पोलीस बनून यशाचा टप्पा... (विभागीय संपादक अब्दुल कादिर गिरड:) येथील गरीब कुटुंबातील गुरूदेव रत्नाकर सेलोरे याने आपल्या मेहनत व जिद्दीच्या जोरावर पोलीस बनून सिद्ध करून दाखवले गुरू हा नुकतीच वर्धा येथे पोलीस भर्ती उत्तीर्ण झाला आहे. असुन त्याच्या या यशाच सर्वत्र कौतुक केले जात आहे. गुरूदेव सेलोरे यांचे आईवडील रोजमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.घरी पाहिजे तसे कोणीही शिक्षित नाही.गुरू याने गिरड येथील पेट्रोलपंपवर काम करून कसबस १२ वी पर्यंत शिक्षण घेतले मात्र पुढे शिक्षण घेण्यासाठी पाहिजे तसी परीस्थितीत नसल्याने त्याने काम करून पोलीस भर्तीची तयारी सुरु केली. त्याने आपल्या मेहनत व चिकाटीच्या जोरावर वर्धा येथील पोलीस भर्ती करीता अर्ज दाखल केला आणि पहिल्यांच भर्ती मध्ये तो उत्तीर्ण झाला. याची माहिती त्याच्या आईवडीलांना मिळताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू अनावर झाले. गुरूदेव सेलोरे याने कुटुंबातील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून काम करून स्वताला व आईवडिलांना सहारा तर दिला सोबत आपण मोठी नौकरी करू शकत नाही हे त्याला ठावूक असल्याने त्याने मनात कमी शिक्षणात पोलीस दलात जाऊन नागरीकांचे संरक्षण करण्याचे ठरवले. आणि आज त्याने पाहिलेल्या स्वप्न पूर्ण झाले.गुरूच्या यशाची माहिती मिळताच गिरड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रशासक राजु नौकरकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रशासक विलास नवघरे यांनी त्यांच्या घरी जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याच्यासह त्यांच्या आईवडीलांचा सत्कार करून गुरुच्या कामगिरीचे कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुरूदेव सेलोरे यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य फकीरा खडसे, डॉ महैश गौर, गिरड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रशासक राजु नौकरकर, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रशासक विलास नवघरे, पोलीस पाटील मनोज तेलरांधे, माजी पंचायत समिती सदस्य शेख ईस्राईल, माजी सरपंच दिपक पंढरे, विजय तडस माजी उपसरपंच मंगेश गिरडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे, श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष बलवंत गाठे, गजानन गारघाटे, प्रशांत ठाकूर, संदीप शिवणकर, सोनु भांदककर,आदिसह गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

