विराट आक्रोश मोर्चा**खामगांव येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रशासनाने लवकरात लवकर नियमाकुल करावा-- परिमल कांबळे* दिनांक 23/03/2026रोजी, खामगाव शहर जिल्हा बुलढाणा येथे दोन दिवसापूर्वी स्थापित झालेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या करिता संघर्ष करीत असलेल्या स्थानिक युवक कार्यकर्त्यांच्या हाकेला प्रतिसाद देण्याकरिता, त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य स्मारक तयार करून पुतळा नियमाकुल व कायमस्वरूपी करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या मागणीला समर्थन देण्याकरिता आपल्या समर्थकांसह खामगाव शहरातील रेल्वे स्टेशन चौकाच्या ठिकाणी उपस्थित होतो, खामगाव शहरातील हजारो समाज बांधवांच्या तीव्र भावना असून सर्वानी सामाजिक ऐक्यचे विराट प्रदर्शन केले, लवकरच या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून खामगाव शहरातील सा. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा व स्मारक निर्माण करण्याकरिता शर्तीचे प्रयत्न केले जातील, त्या संदर्भात पोलीस प्रशासनाची व नगरपालिका प्रशासन चर्चा झाली, याप्रसंगी, विलासराव मानवतकर ,नानासाहेब शिंदे, आशुतोष खंडारे, सोपान वानखडे नितीन सोनवणे आशिष साळवे, कृष्णा नाटेकर, सुरेश बोरकर, लखन सोनोने , विनोद खवेकर,श्री सकट साहेब, सुरेश तांबे विनोद चव्हाण गणेश चांदणे अर्जुन कासारकर योगेश नाटेकर किशोर गायकवाड योगेश साबळे सुभाष वानखेडे रुपेश अवचार इत्यादी हजारो युवक- युवती, माता महिला आक्रमक युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.[25/03, 8:00 am] MPT अकोला ʀᴀᴊᴇꜱʜ ᴀᴠᴄʜᴀʀ: उपविभागीय अधिकारी खामगांव यांना मातंग समाजाच्या वतीने श्री परिमलदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले
byमीडीया पोलीस टाईम
-
0

