संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा ग्रामीण उपध्यक्षपदी अमृत पाटील यांची निवड.. (पिंजारी माहेमूद तालुका प्रतिनिधी देगलूर)देगलूर. येथील शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पदनियुक्ती व पक्षप्रवेशसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात देगलूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या अनेक पदाधिका-यांनी व कार्यकत्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश करून संघटनेला बळकटी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रम ास संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील शिंदे (करडखेडवाडीकर), याचा हस्ते अमृत सोपानरावं याची नांदेडजिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष. पदी निवड कारण्यात आली उपस्थिती पदाधिकारी. संतोष चिद्रावार लोणीकर, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी जाधव (अंदेगावकर), जिल्हा संघटक दत्ता पाटील केरूरे (सुगावकर), विधानसभा अध्यक्ष देविदास थडके तसेच तालुकाध्यक्ष शहाजी बाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनी संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेविषयी मार्गदर्शन करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकत्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी देगलूर तालुक्यातील विविध पदांसाठी पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या उपस्थित होती.
byमीडीया पोलीस टाईम
-
0