कुसूंबा बुद्रुक गावात पोलीसांचा धाक संपला.गावात बेवळ्यांचा धुमाकूळ, दिवसेंदिवस जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा बेवळ्यांचा प्रयत्न.. रावेर पोलीस लक्ष देणार का ?ग्रामस्थांचा सवाल?

कुसूंबा बुद्रुक गावात पोलीसांचा धाक संपला.गावात बेवळ्यांचा धुमाकूळ, दिवसेंदिवस जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा बेवळ्यांचा प्रयत्न.. रावेर पोलीस लक्ष देणार का ?ग्रामस्थांचा सवाल?

जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर 

रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या आणि गुण्यागोविंदाने नांदत असणाऱ्या कुसूंबा बुद्रुक गावाचा नकाशा बिघडण्याची दाट शक्यता सध्या स्थितीत भासु लागली आहे.सध्यास्थितीत सर्वसामान्य जनतेला,नागरिकांना, विनाकारण शिवीगाळ,धमक्या,खुन करण्याच्या प्रकरात वाढ होण्याची व मानवी जीवीतहानी होण्याची दाट शक्यता भासत आहे,बेवळ्यांमुळे गावाचा नकाशा बिघडणार? त्याआधी रावेर पोलीसांनी सतर्क होऊन बेवळ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे आणि पोलीसही फटके देऊन त्यांची दादागिरी काढायला पाहिजे तेव्हा पोलीसांचा दबदबा कुसूंबा गावात निर्माण होईल अशी कुसुंबा गावांसह परिसरातील जनतेमध्ये चर्चा जोर धरू लागली आहे.आणि कुसुंबा गावात पोलीसांचा धाक संपला.असेही महिला आणि जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र सध्या स्थितीत जोर धरत आहे.दारु पिऊन बेवळ्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे ही नागरिकांकडुन बोलले जात आहे.. गावात सकाळी सकाळी बस स्टँड परिसरात दारु पिऊन भरचौकात दांगोडे करतांना बेवळे कोणाचेही लक्ष नसतांना दगड मारुन फेकणे..विळा सारखे धारदार शस्त्र हातात घेऊन फिरणे.आणि सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे प्रकार दिवसेंदिवस कुसुंबा बु.गावात वाढत चालले आहे..तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी रावेर पोलिसांची भुमिका दिसत आहे..ह्या सर्व प्रकाराकडे मात्र रावेर पोलीसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे.आणि रावेर पोलीस कुसुंबा गावाकडे तसेच रावेर पोलीस हे  कुसुंबा बु..गावाकडे फिरुन सुद्धा पाहत नाही असेही चित्र दिसत आहे.भाड मे जाए जनता और अपना काम बनता.गावात काहीही घटना घडो आम्हाला काही घेणेदेणे नाही अशी रावेर पोलीसांनी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्याचबरोबर ह्या सर्व प्रकाराचा जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने विचार करुन रावेर पोलिसांना सतर्क होण्याच्या सुचना देऊन पोलीसी फटके कसे असतात हे बेवळ्यांना दाखवुन देणे अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणि कुसूंबा गावात दररोज पोलीसांची पेट्रोलिंग सुरू करावी व कुसुंबा बुद्रुक गाव शांततेत नांदु द्यावे अशी रास्त स्वरुपाची मागणी गावकरी, नागरिक, शेतकरी, महिला यांचेकडुन जिल्हा पोलीस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी आहे..
Previous Post Next Post