कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगावची जिल्हाधिकारी जळगाव समवेत विविध प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न*

*कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगावची जिल्हाधिकारी जळगाव समवेत विविध प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न* 

(जळगाव खान्देश विभागीय संपादक प्रविण मेघे)

आज दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी कास्ट्राइब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगावची कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नां संदर्भात जिल्हाधिकारी माननीय रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी मा.श्रीमंत हारकर , निवासी उपजिल्हाधिकारी मा.वैशाली चव्हाण तसेच आस्थापना तहसीलदार मा.ज्योती गुंजाळ यांच्या समवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या नेतृत्वात तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके , वनविभाग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे ,मनपाचे अध्यक्ष सुरेश भालेराव , महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, जिल्हा उपाध्यक्ष  आनंदकुमार मानकर , जिल्हा संघटक महेश सपकाळे , राहुल सोनवणे , रवींद्र गायकवाड ,नंदकुमार गायकवाड , सुभाष तायडे यांच्या समवेत खालील प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. 1. बिंदू नामावली व सरळ सेवा भरती बाबत 2. मागासवर्गीय कक्षास प्राप्त तक्रारींचा निपटारा करणेबाबत 3. दिव्यांग बिंदू नामावली तसेच यूआयडी कार्ड तपासणी बाबत 4. विशाखा समिती तक्रार निवारण बाबत 5. प्रतिनियुक्ती कर्मचारी बाबत 6. वनविभाग परिपत्रक 1 डिसेंबर 2023 परिपत्रक बाबत 7. वर्ग चार कर्मचारी ड श्रेणी आकृतिबंधाबाबत 8. आश्वासित योजना लाभाबाबत   9. सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणाबाबत 10. सेवानिवृत्ती धारकांच्या विधवा , परितक्या , विकलांग दुर्बल अपत्याबाबत 11. झालेल्या पदोन्नती यादी बाबत 12. निलंबित व बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत 13. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या जागी नेमणुकीबाबत. इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली सदर विषयातील अडचणी लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पुढील बैठक जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येईल व सर्व विभाग प्रमुखांना वैयक्तिक बैठकीही घेण्याबाबत तात्काळ पत्र देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सदर बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते.
Previous Post Next Post