फैजपूरमध्ये नगरपरिषदेच्या सभागृहाची दयनीय अवस्था; नागरिक संतप्त, तातडीच्या दुरुस्तीची जोरदार मागणी!*

*फैजपूरमध्ये नगरपरिषदेच्या सभागृहाची दयनीय अवस्था; नागरिक संतप्त, तातडीच्या दुरुस्तीची जोरदार मागणी!*

(रावेर / शेख शरीफ)

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर 
शहरातील सुभाष चौक परिसरात असलेल्या नगरपरिषदेच्या महात्मा गांधी बहुउद्देशीय सभागृहाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या सभागृहाबाबत आता नागरिकांनी एकत्र येत नगरपरिषदेकडे लेखी निवेदन सादर करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
नागरिकांच्या मते, सभागृहात नियमित साफसफाई होत नसल्याने घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. खोल्यांचे दरवाजे व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असून, टॉयलेट आणि बाथरूमची स्थिती अत्यंत बिकट आहे. याशिवाय, वीज आणि पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने कार्यक्रम आयोजित करणे अशक्यप्राय बनले आहे.
 *मुख्य समस्या*
साफसफाईचा पूर्ण अभाव
तुटलेले दरवाजे व खिडक्या
अस्वच्छ टॉयलेट व बाथरूम
वीज व पाण्याची अपुरी सुविधा
सभागृह परिसरात दुर्गंधी व घाणीचा त्रास
नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, सभागृहाची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास, हे सभागृह लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाईल. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
👉 यासोबतच, सभागृहाच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी चौकीदार नेमण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन उमेर मेडिकल, शहीद, जलील कुरैशी, काशिफ मेंबर, असलम मिस्त्री, अझहर, कैलाश भोई, राजा चंदनशिव, नितीन भोई, निलेश भोई, रियाज मेकॅनिक, दानिश मेंबर, डिगा सेठ आदी नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आले.


*आता प्रश्न एकच — नगरपरिषद जागी होणार की नागरिकांचा संताप आणखी भडकणार?*
Previous Post Next Post