धोंडगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यां दोन्ही महामानवांची संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा .

धोंडगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यां दोन्ही महामानवांची संयुक्त जयंती कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा .  
       
धोंडगाव वर्धा तालुका प्रतिनिधी यश राऊत

 दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यर्पण करण्यात आले.यावेळी पोलीस स्टेशन गिरड येथील सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड,पोलीस शिपाई गणेश इंगळे,तंटामुक्ती अध्यक्ष कवडू थुटे,शिक्षक सुभाष नन्नावरे,वहानगाव येथील माजी पोलीस पाटील नरुले,विजय उमाटे,दिलीप कोल्हे,पंढरी उमाटे,जय थुटे,पुरुषोत्तम राऊत,गजानन मेश्राम,धर्मेंद्र येडे,यश राऊत,नागेश गायकवाड,रतन थुटे,नयन वटे,अजित आत्राम,आकाश सातपुते,रोशन निरगुडे,अमित तेलंग,सदानंद जांभुळकर,गंगाधर सहस्त्रबुद्धे,सुनील वाघमारे व रितिक बुरचुंडे इत्यादी उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मंत्र देत त्यांनी समता, न्याय व बंधुतेसाठी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, शोषित-वंचितांचे कैवारी,समाजसुधारक आणि अर्थतज्ज्ञ होते.
महाराष्ट्र शासनातर्फे हा दिवस ज्ञान दिन (Knowledge Day) म्हणून साजरा केला जातो.
जागतिक मान्यता: कॅनडा आणि अमेरिकेतील काही प्रांतांतही १४ एप्रिल 'समता दिन' (Equality Day) म्हणून पाळला जातो.
बाबासाहेबांनी शिक्षण आणि कायदेशीर हक्कांच्या माध्यमातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती रॅली, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. समाज समरसता आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे. इत्यादी मार्गदर्शन पोलीस स्टेशन गिरडचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष नन्नावरे यांनी केले ;तर आभार प्रदर्शन जय थुटे यांनी मानले.
मीडिया पोलीस टाइम्स  यश राऊत
Previous Post Next Post