फैजपुर पोलीस स्टेशनचे एपीआय रामेश्वर मोताळे यांची पीआयपदी निवड
फैजपूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले एपीआय रामेश्वर मातोळे यांची पी आय पदी निवड झाली असून फैजपुर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुन्हेगारीवर वचक बसवणे, गुन्ह्यांची उकल करणे आणि सामान्य नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेची आणि सेवेची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्यांना पीआयपदी पदोन्नती दिली आहे या निवडीबद्दल. फैजपुर पोलीस स्टेशनला एपीआय असलेले रामेश्वर मातोळे यांचे पाडळसा येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार तसेच भालोद चे पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे तसेच पीएसआय मिरज गोकील सोबत फैजपुर चे पत्रकार सलीम पिंजारी यांनी त्यांचे स्वागत केले
फैजपुर उपविभागीय संपादक सलीम पिंजारी

