रावेर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला..

रावेर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला..                                                     
रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी नरेंद्र भालेराव 

        मुंबई येथे झालेल्या मीटिंगमध्ये जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन आणि मदत पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तथा सततच्या मागणीमुळे मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील खालील गावांना न्याय मिळणार आहे मुक्ताईनगर (४१३/२२) प्रमुख गावे भोकरी, पातोंडी, सुलवाडी, कोडदा, ऐनपुर, अंतुर्ली, धामंदे, नरवेल, पिंपरी नांदू, बेलसवाडी, मुधोळदे, खडकाचे, उचंदा, मोंढोदे, शेमडदे, मेड सांगवी, पंचाणे, खामखेड, भामलवाडी, सिंगाडी, धामोडी, मंगलवाडी, कांडवेल, तांदळवाडी, पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आणि आंदलवाडी, सिंगत या गावांचा मार्ग मोकळा खूप वर्षापासून हा पुनर्वसन प्रश्न मार्गी लागत नसल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने पुनर्वसन मधल्या गावांचा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी सतत लावून धरून हा खूप वर्षांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आमदार चंद्रकांत पाटील यांचं या  गावांमध्ये पुरुष महिला कौतुक करत आहे . या संपूर्ण गावांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे मुंबई येथील बैठकीस मान्यवरांची उपस्थिती या बैठकीला जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे, यांच्यासह भाजपा रावेर लोकसभा लोकसभा संपर्क प्रमुख नंदकुमार महाजन महाराष्ट्र राज्य मापादा अध्यक्ष विनोद तराळ आणि संबंधित गावातील प्रमुख प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस टाईम वार्ता नरेंद्र भालेराव
Previous Post Next Post