राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने देगलूर तहसीलदारांना निवेदन.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी: देगलूर
देगलूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशनही मिळत नाही. प्रतिव्यक्ती रूपये ही मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याची राशन मिळत नाही. देगलूर तालुक्यातील शेतकऱ्याचे बरेच दिवसापासून स्वस्त दुकानातून धान्य मिळणे बंद झाले आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले. ते रक्कमही मिळेल असे सांगण्यात आले परंतु आजता. गायत रक्कमही मिळाली नाही. असे बरेच शेतकरी आहेत की, रक्कमही नाही राशनही नाही शासनानी गोरगरीब जनतेसाठी ही योजना. राबवितआहे. योजनेची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसुन त्यामध्ये दिरंगाई होत आहे देशाचा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, परंतु वरील योजनेपासून शेतकरी वर्ग वंचित आहे. जनतेस स्वस्त धान्य दुकानातून राशनही जसे देतात तसेच रक्कम ही अदा करण्यात यावे. जे शेतकरी स्वस्त धान्य रक्कमची आशा करत नाही त्वरित त्यांना स्वस्त धान्य दुकानातून राशन द्यावे अशी मागणी राष्ट्रीय संविधान बचाव अभियान शाखा देगलूर चे अध्यक्ष एडवोकेट अशोक कापसे शेळगावकर प्रा. सुरेश वनंजे, व तसेच लाभार्थी उत्तम पाटील, हनमंत गुडफळे, इत्यादींनी देगलूर तहसीलदार सूर्यवंशी साहेब यांना विकी निवेदन देऊन आपली मागणी केली आहे.

