*मरणानंतर ही जग दाखवणारे विरुटकर पाटील*
*स्व. गोविंदराव विरुटकर यांचे मरणोत्तर नेत्रदान*
महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
भद्रावती दि.20:- कोरपणा तालुका गडचांदूर मातोश्री पॅथलॉजी चे संचालक शैलेश विरुटकर यांचे वडील स्व. गोविंदराव विरुटकर यांचे 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले ते वय 95 वर्षांचे होते
शैलेश विरुटकर यांचे वडील हे सेवानिवृत्त पटवारी होते आधीपासूनच त्यांच्यात समाजसेवा करण्याचा ध्यास होता वयाच्या 90 व्यक्ती वर्षी त्यांनी मारणोत्तर नेत्रदांनाचा संकल्प घेतला होता आज त्यांचे दीर्घ आजारणे निशाणी झाले मात्र त्यांच्या सेवेचा वारसा त्यांचा मुलगा शैलेश विरुटकर यांनी चालू ठेवला मृत्यू नंतर दुःखावर मत करत नेत्रदान कारण्याचा वडिलांची आठवण करून गेली त्यांची लगेच सतीश बिडकर यांना सांगून नेत्रपिढीतील डॉक्टरांना माहिती दिली चंद्रपूर येथील नेत्रपिढीची चमू येऊन त्याचे नेत्रदान घेऊन पुढील नेतृहीन यांना नेत्र देऊनही त्यांना प्रकाशाच्या झोतात आणणार असून या पेक्षा मोठे दान काय असू शकते. यावेळी त्यांच्या परिवारातील मुलगा योगेश्वर गो. विरुटकर, शैलेश गो. विरुटकर सून स्मिता शै. विरुटकर बहीण जीवनकला मत्ते, भारती येरगुडे, हेमलता चटप, जावई यादवराव चटप भास्कर चटप, नातू डॉ जयदीप चटप,दीपक चटप, ऋषीं विरुटकर, प्रहार चे जिल्हा अध्यक्ष सतीश बिडकर डॉ विशाल धोटे, महेश आवारी शंकर ठावरी, प्रतीक खैरे इत्यादी आप्त परिवार व मित्र परिवार उपस्थित होते.
*स्वर्गीय श्री गोविंदरावजी विरुटकर यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान करून मानवतेसाठी महान आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या पुण्यकार्यामुळे इतरांना नवजीवन आणि प्रकाश मिळणार आहे. त्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. असे सर्व स्तरातून कौतुक होत आहे*
यावेळी श्री. सुधाकरजी पेन्दाम
नेत्रचिकित्सा अधिकारी
जिल्हा रुग्णालय चंद्रपूर श्री. योगेंद्र इंदोरकर समोपदेशक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर श्री. ऋषभ भुमे वाहनचालक
जिल्हा रुग्णालय चंद्रपूर डॉ. प्रविण येरमे
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय गडचांदूर श्री. आशिष दानव
सफाई कर्मचारी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर नेत्रपिढीतील चमू उपस्थित होती.

