महादेव काठी निमित्य मुस्लिम भावंडाकडून थंड पाण्याचे आयोजन.
पिंजारी माहेमूद तालुका
प्रतिनिधी: देगलूर
देगलूर : धर्मापुढे माणुसकी मोठी सगरोली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माधव काठीच्या यात्रे सोहळ्यात मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांना अनेक वर्षा पासून थंड पाणी वाटप.आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माची लोक राहतात आणि त्यामुळेच देशात अनेक धार्मिक सोहळे दरवर्षी उत्साहाने पार पाडले जातात. अशात आपल्या सगरोली येथील हसन आतार आणि हुसेन आतार अशा दोन भावडानी आई वडिलांची शिकवण जोपासत त्याचे वारसा पुढे नेत त्याच्या नावाचा फलक लावून मागील काही अनेक वर्षांपासून मोफत थंड पाणी वाटप करत एक त्याच्या वसाला पुठे नेत आहेत आता हिंदू धर्मात वारीला फार महत्त्व दूरदूरवरून येणारे भाविक वारीत सामील होतात. मुखी हरिनामाचे नामस्मरण, गळ्यात जपमाळ आणि हातात टाळ घेऊनी वारकरी संप्रदाय मोठ्या भावनेने देवाची वारी करतात. अशा वेळी उनाच्या तापमानामुळे भाविक भक्तांना त्याच्या सेवेसाठी आतार फॅमिली तर्फे थंड पाण्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांचे भावीक भक्तांकडून तसेच ग्रामस्थांकडून त्यांना शुभेच्छा वर्षाव होत आहे.

