खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकारातून जि.प.प्रा.शाळा येरगी येथे ओपन जिम.


खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पुढाकारातून जि.प.प्रा.शाळा येरगी येथे ओपन जिम.

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी: देगलूर नांदेड 

 देगलूर :येरगी नांदेड जिल्हाचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून सीएसआर निधीतून तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ओपन जिम बसवण्यात आले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ओपन जिममुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ व निरोगी राहिल व तसेच विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लागण्यास मदत होईल. शालेय विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घेऊन खा. गोपछडे यांनी ही ओपन जिम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगी शाळेसाठी मंजुर करून दिल्यामुळे सर्व विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. सदरील ओपन जिम चे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे सुभाष पाटील थडके, उमाकांत पाटील थडके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरपंच संतोष पाटील येरगीकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार, विश्वनाथ बागेवार, अशोक वाघमारे, चेअरमन प्रभु चेंडके, मा. चेअरमन गणपत येरपलवार, वैजनाथ कालींगवार, बसवंत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सायलू कांबळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे, मुख्याध्यापक नागोराव चव्हाण मल्लिकार्जुन भोकसखेडे, माजी सरपंच चांदु कांबळे, शंकर वाघमारे, अशोक येरपलवार, प्रभाकर कालींगवार, भद्रु चेंडके, रमेश गटावार, नागनाथ बरसमवार, विठ्ठल कांबळे, विश्वनाथ भोकसखेडे, इरवंत कालिंगवार, मारोती सुर्यवंशी, शिक्षक वृंद, विद्यार्थी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post