कोतवालपुरा* परिसरातील बंद पथदिवे तत्काळ सुरू
*बंद पथ दिवे सूरू झाल्याने नागरिकांकडून कौतुक*
*
मानवत / परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
———————————
मानवत दिनांक १७ एप्रिल शुक्रवारी रोजी
मानवत शहरातील *कोतवालपुरा* परिसरातील भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विद्युत खांबांवरील पथदिवे बंद होते. यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. सदरील बाब सुज्ञ नागरिकांनी मानवत नगर परिषद कार्यालयातील विद्युत विभागातील कर्मचारी झोडपे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ कार्यवाही करत पथदिवे दूरूस्त केले.
यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले जात आहे.
मानवत नगरपरिषदचे मुख्य अधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरातील प्रत्येक प्रभागात नागरी सुविधा पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.
दरम्यान, विद्युत विभागातील अभियंता, झोडपे व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
***

