मानवत ते रामेटाकळी रस्त्याची दैणीय अवस्था झाल्याने ग्रामीण भागाचा विकास खूंटला
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
———————————
*पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील ग्रामीण भागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व जिल्हा परिषद मतदार संघातील अनेक गावे आज ही विकासा पासून कोसो दूर राहिल्याने मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास खूंटला आहे.
काही विकास कामे कागदावर तर अनेक कामे संथ गतीने सूरू आहे. तर मार्च एण्ड मुळे अनेकांनी कामे थांबविली तर एप्रिल महिना ऊजाडला तरी विकास कामाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्यामूळे पाथरी विधान सभा मतदार संघातील विकास कामे खूंटली आहे त्यामूळे ग्रामिण भागाचा अर्थीक कणा मोडकळीस आला आहे.
लोककल्याणकारी प्रशासन याकडे लक्ष देईल का ? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
मतदार संघात विकासाची व रोजगारांची कामे सूरू करून विकासाकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामिण भागातून होत आहे.
*अनिल चव्हाण // मानवत.*
*

