*"काही पेटवण्याची इच्छा असेल तर गरिबाची चूल पेटवा"; प्रा. सोहेल अमीर शेख जी यांचे भावनिक आवाहन*
*ईदमिलन सोहळ्यात प्रतिपादन*
(रावेर / शेख शरीफ)
उमरखेड जि यवतमाल
"मने मिळवण्यासाठी एकमेकांच्या जवळ येणे गरजेचे आहे. आज जगात जे विभाजन होत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्य स्वतःला मोठे समजत आहे. वास्तविकता ही आहे की, सर्व मानव एकाच निर्मात्याची लेकरे आहेत. एकमेकांचा आदर करणे हाच इस्लामचा मूळ संदेश असून, हाच विचार आपल्याला जगात पुढे घेऊन जाईल,समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'निर्मात्याची ओळख (ईशभय) असणे गरजेचे आहे ."जर तुम्हाला काही पेटविण्याची इच्छा असेल, तर गरिबांची चूल पेटवा," असे भावनिक आवाहन करत त्यांनी गरिबांच्या गरजा पूर्ण करणे आणि मुलांना नैतिक शिक्षण देणे हीच खरी समाज विकासाची ऊर्जा असल्याचे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. सोहेल अमीर शेख जी यांनी केले.
ते जमाअत-ए-इस्लामी हिंद, उमरखेडच्या वतीने स्थानिक अनंतराव देवसरकर सभागृहात आयोजित ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते,
रोजाच्या आध्यात्मिक पैलूंवर प्रकाश टाकताना प्रा. अमीर जी म्हणाले की, "रोजा म्हणजे 'थांबणे'. ईश्वराच्या आदेशासाठी माणूस आपल्या हक्काच्या अन्नापासून आणि पेयापासून दूर राहतो. जर आपण ११ महिने हराम कमाई आणि व्यसनांपासून दूर राहिलो, तरच खऱ्या अर्थाने रोजाचे उद्दिष्ट साध्य होईल. पत्नीवर वाईट दृष्टी टाकू न शकणारा माणूस इतरांच्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने कसा पाहू शकतो? हेच रोज़ा शिकवतो.
जर प्रत्येकाला आपण ईश्वराच्या देखरेखीखाली आहोत याची जाणीव झाली, तर गुन्हेगारी आणि द्वेष आपोआप संपेल.
या कार्यक्रमातून 'प्रेम आणि बंधुत्व' असलेला भारत घडवण्याची प्रार्थना करण्यात आली.
प्रमुख अतिथी म्हणून भन्ते किर्ती बोधी ,अकील मिर्झा जिल्हा संघटन यवतमाळ ,शेख नईम पुसद ,हनुमंतराव गायकवाड ,विजय बेतेवाड , शंकर पांचाळ ,शिवाजीराव वानखेडे , विजय रेघाटे,डॉ . आशिष खांबाळकर डॉ दळवी , प्रा धनराज तायडे सह शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

