यावल शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटात उत्साहात साजरी.
यावल तालुका शहर प्रतिनिधी आरिफ खान
यावल शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील पंचशील नगर मधून यावल नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. छाया ताई अतुल पाटील व यावल रावेर विधानसभेचे तरुन तडफदार आमदार अमोल हरिभाऊ जावळे साहेब यांच्या शुभहस्ते 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी अकरा वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला व फोटो ला गुलाब पुष्प व हार अपर्ण करण्यात आली व मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि यावल नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते

