कडकडीत बंदच्या बॅनर मुळे पाथरी विधान सभा मतदार संघातील व्यापार्‍यात नाराजी*“जाचक नियमांना कंटाळले विक्रेते; पाथरीत कृषी निविष्ठा दुकाने सोमवारपासून बेमुदत बंद!”

*कडकडीत बंदच्या बॅनर मुळे पाथरी विधान सभा मतदार संघातील व्यापार्‍यात नाराजी*

“जाचक नियमांना कंटाळले विक्रेते; पाथरीत कृषी निविष्ठा दुकाने सोमवारपासून बेमुदत बंद!”


 मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण 
———————————
कृषी विभागाच्या जाचक अटी व नियमांच्या विरोधात पाथरी शहरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीव्र भूमिका घेतली असून, येत्या सोमवार दि. 27 एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी कृषि विभागाला याबाबतचे निवेदन दि. २४ एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे .या आंदोलनात तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पाथरी तालुका सिडस अँण्ड फर्टीलायझर पेस्टीसाईडस असोशिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स अँड सीड्स डिलर्स असोसिएशन (माफदा) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राबविण्यात येणार असून, कृषी विभागाच्या धोरणांमुळे विक्रेत्यांवर वाढत चाललेला आर्थिक व प्रशासकीय ताण हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केले जाणारे ‘लिंकिंग’ त्वरित बंद करावे
शेजारच्या राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कापूस बियाणांच्या विक्रीवर कठोर बंदी आणावी
आगामी खरीप हंगामात खत व बियाणे वितरणाच्या धोरणात पारदर्शकता आणावी
कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर लादण्यात येणाऱ्या जाचक अटी व नियम रद्द करावेत
⚠️ विक्रेत्यांची आर्थिक कुचंबणा
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांकडून पुरवठा करताना बंधनकारक अटी लादल्या जात असल्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यातच अप्रमाणित बियाण्यांचा वाढता बाजार आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे प्रामाणिक विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.
🌾 शेतकऱ्यांवर परिणाम होणार?
या बेमुदत बंदमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी वर्गातूनही व्यक्त होत आहे . कृषी क्षेत्रातील वाढत्या अडचणी आणि प्रशासनाच्या धोरणांविरोधात पाथरीतील हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, येत्या काही दिवसांत यावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


*****
Previous Post Next Post