इळेगाव व नागठाणा (बु) या दोन्ही गावांनी घेतला ऐतिहासिक निर्णय..*

*इळेगाव व नागठाणा (बु) या दोन्ही गावांनी घेतला ऐतिहासिक निर्णय..*

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर 

आज घेतलेला निर्णय हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, तो एकजुटीचा,विश्वासाचा आणि गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेला परिपक्व निर्णय आहे,अशा प्रकारे शांततेत आणि समन्वयाने घेतलेले निर्णय हे समाजात सकारात्मक संदेश देणारे ठरतात,
आज  इळेगाव व नागठाणा बु या दोन्ही गावच्या  ग्राम पंचायत कार्यालय ठीकाणी सेवा सहकारी सोसायटी च्या  सर्वसाधारण सभा पार पडल्या असुन सदरील सभेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदार,सुचक, अनुमोदक, उमेदवार या करीता प्रतिनिधी म्हणून *या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश जी पवार साहेब व लोकनेते मारोतराव कवळे गुरुजी यांचे खंदे समर्थक असलेले*
*मल्लिकार्जुन मारोतराव चंदापुरे साहेब नागठाणा (बु)*
*श्री. दिलीप दुलबा पाटील कवळे इळेगाव* यांची निवड करण्यात आली असुन सदरील निवड ही सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली.
आजच्या सर्वसाधारण सेवा सहकारी सोसायटी च्या सभांमध्ये सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दाखवलेली एकता, संयम आणि जबाबदारीची जाणीव खरोखरच कौतुकास्पद आहे. बिनविरोध निवड होणे म्हणजे केवळ एक प्रक्रिया नाही, तर तो एकमेकांवरील विश्वासाचा आणि एकोप्याचा सर्वोच्च नमुना आहे.
निवड झालेल्या प्रतिनिधींवर गावकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवला आहे. त्यांनी हा विश्वास जपत प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि जनहिताचा विचार करून कार्य करावे, ही सर्वांची अपेक्षा आहे. गावाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, हीच खरी आशा आहे.
हा ऐतिहासिक निर्णय घेताना ज्या पद्धतीने सर्वांनी शांतता, संयम आणि संघर्षाची भावना जपली, ती निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. गावाच्या एकात्मतेची ही ताकद पुढील काळातही कायम राहो, हीच मनापासून शुभेच्छा.
या निर्णयामागे उभ्या असलेल्या सर्व संचालक मंडळाचे, पदाधिकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. भविष्यातही अशीच एकजूट आणि सहकार्य टिकून राहो, हीच सदिच्छा..
Previous Post Next Post