कराटे बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन*

*कराटे बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन* 

अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान 

अकोला:दि. २६ एप्रिल २०२५ रोजी श्री संत रविदास महाराज सभागृह, मोठी उमरी येथे स्टॉग सोतोकॉन स्पोर्ट्स कराटे-डो ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने कराटे बेल्ट परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या परीक्षेचे आयोजन डॉ. सेन्साई खुशबू चोपडे यांनी केले होते. परीक्षेचे प्रमुख (Examiner) म्हणून सिहान अरुण सारवान यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच या कार्यक्रमास साक्षी जोगे व फ्लोरेन्स नाशिकर , आदेश इंगळे उपस्थित होते.
या परीक्षेत खेळाडूंची प्रॅक्टिकल, फिजिकल, ओरल व लेखी परीक्षा घेण्यात आली.
 बेल्टनुसार यशस्वी विद्यार्थी
 Yellow Belt:
मिताली बल्लाळ, अविश शिरसागर, अथर्व बल्लाड, कृष्णाली मुरई, इशिता मुरई, प्रांजली इंगळे, प्रितेश मोरया, परवेश मोरया, अनया मेश्राम, अविघ्न खीरेकर, रिद्धी बेडकर, कृष्णाई भिरड, गौरी खंडारे, आराध्या चिंचोलकर, टी. बी. हिवरे, अगस्त्य खीरेकर, रेवती पटके, कृष्णाली आढाव, सूर्यांशु येणकर
Green Belt:
सूर्यवीर चोपडे, स्वरा पावणे, स्वानंदी ब्राह्मणकर, देवराज भांडेकर, प्रीषा निकाळजे, मीनल चोपडे, सोनू कार्या, ईश्वरी रोडे, साक्षी ब्राह्मणे, संजना सातरोटे
Orange Belt:
श्रेया बोडके, तनिष्का बोधडे
 Blue Belt:
स्वराज पावसाळे
 Brown Belt (First):
यथार्थ टेकाडे
 कराटेचे फायदे
कराटे हा केवळ एक खेळ नसून शरीर, मन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 शारीरिक फायदे:
शरीर फिट आणि मजबूत बनते
ताकद, स्टॅमिना व लवचिकता वाढते
संतुलन सुधारते
हृदयाचे आरोग्य चांगले राहते
रिफ्लेक्स आणि वेग वाढतो
 मानसिक फायदे:
एकाग्रता वाढते
तणाव कमी होतो
निर्णयक्षमता सुधारते
आत्मविश्वास आणि शिस्त वाढते
 स्वसंरक्षण:
धोक्याच्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करता येते
महिला व मुलींसाठी विशेष उपयुक्त
संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची सवय लागते
 व्यक्तिमत्व विकास:
आत्मविश्वास वाढतो
संवाद कौशल्य सुधारते
नेतृत्व गुण विकसित होतात
इतरांचा आदर करायला शिकवते
 स्पर्धा व करिअर:
जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी
प्रमाणपत्रे व पदके मिळतात
करिअर संधी – प्रशिक्षक, रेफरी, फिटनेस ट्रेनर
क्रीडा कोटामध्ये प्रवेशाची संधी
 निष्कर्ष
कराटे शिकणे म्हणजे केवळ लढणे नव्हे, तर शरीर, मन आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे होय. आजच्या काळात प्रत्येकाने कराटे किंवा स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. *अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*
Previous Post Next Post