अर्धापूरात ७ कोटी ३० लाख रुपयांचे कामाचे भुमीपुजन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते.

अर्धापूरात ७ कोटी ३० लाख रुपयांचे कामाचे भुमीपुजन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते.

पिंजारी माहेमूद 
 तालुका प्रतिनिधी: देगलूर 

देगलूर: अर्धापुरात ७ कोटी ३० लाख रूपयांच्या कामांचे भूमिपूजन नगरपंचायतीने शासकीय जमीनीवरील अतिक्रमण असलेल्या शहरातील १२३४ मालमत्तांची नोंद केली आहे. राज्य सरकारने अतिक्रमण धारकांसाठी निवासी घरे उपलब्ध व्हावेत यासाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे येत्या डिसेंबर पर्यंत ही अतिक्रमणे नियमित करुन त्यांना पंतप्रधान आवास योजनांचा लाभ देण्यात यावा अशी सूचना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी नगरपंचायत प्रशासानाला शनिवारी केली आहे. शहरातीत विविध भागात वेगवेगळ्या योजनेचा सुमारे ७ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधितुन सिमेंट रस्ते, संरक्षक भिंत, नाली, अंगणवाडी बांधकाम आदी विकास कामे होणार असून या विकास कामांचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री खा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील डॉ. शरद चरखा यांचे रुग्णालय ते तामसा रस्ता सिमेंट रस्ता, बसवेश्वर चौक तामसा रोड ते डॉ. कवठेकर रुग्णालय, दर्गानगर, नवी आबादी परिसरात विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. वैशालीताई देशमुख, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, नांदेड कृषी बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, तालुका प्रभारी किशोर स्वामी, बाजार समितीचे माजी सभापती बी आर कदम, तालुकाध्यक्ष बालाजी जी गव्हाणे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष पवन पाटील इंगोले, शहराध्यक्ष योगेश हाळदे, नगराध्यक्ष प्रतिनीधीप्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण, आनंदराव भंडारे, डॉ. लक्ष्मणराव इंगोले माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे माजी उपनगराध्यक्ष राजु शेटे, व्यंकटराव साखरे, आदी उपस्थित होते. नवी आबादी परिसरात विकास कामांचे भूमिपूजन झाल्यावर एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या समेता संबोधित करताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, शासकीय जमीनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या निवासी घरे उपलब्ध व्हावेत यासाठी निर्णय घेतला आहे. ज्यांचे अतिक्रमण हे २०११ पुर्वीचे आहे अशा अतिक्रमण धारकांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन योग्य ते पुरावे सादर करावेत. येत्या ३१ डिसेंबर पर्यंत ही अतिक्रमणे नियमित करून घ्यावेत. एका कुटुंबाल ५०० चौरस फूट जागादेण्यात येईल. त्यापेक्षा जास्त जागा असेल तर शासनाच्या नियमानुसार निर्णय घ्यावेत अशा सुचना माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी नगरपंचायत प्रश्शासानाला दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी केले तर प्रास्ताविक राजु शेटे यांनी केले. आभार नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख यांनी मानले. शहरातील विविध भागात झालेल्या
विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्याधिकारी जगदीश दळवी, उपकार्यकारी अभियंता सिध्देश्वर निता, उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख, उपअभियंता राधेश्याम जाधव, अभियंता दिपक मुळे, अभियंता संदिप वानखेडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णूकांत क-हाळे, पंडीतराव लंगडे नगरसेवक सोनाजी सरोदे बाबुराव लंगडे, डॉ विशाल लंगडे लगडे, प्रल्हाद माटे,, व्यंकटी राऊत, माजी माजी नगराध्यक्ष प्र उमाकांत सरोदे मुसबीर खतीब.. सलीम कुरेशी, नामदेव सरोदे, विराज देशमुख, बालु पाटील धुमाळ, राजकुमार जाधव, निळकंठ मदने, नामदेव दुधाटे, रामराव भालेराव, नागोराव भांगे, अभिषेक गुस्खेल, शिवराज जाधव, विलास साबळे, अवधुत कदम, पिराजी महाराज साखरे,, कोंडीबा सुर्यवंशी, शिवलिंग स्वामी सचिन कल्याणकर चंद्रमुणी लोणे, गुरुराज रणखांब, शंकर ढगे जेठण मुळे, खंडेराव हाके, परमेश्वर बंडाळे, तुळशीराम बंडाळे विठ्ठल काकडे नवनाथ कपाटे, राजाराम पवार, प्रकाश लोणे, राजु कल्याणकर, बाळू माटे, शुभम साखरे, राजाराम गायकवाड, गंगाधर शेळके, गोपाल पंडित, पंढरीनाथ क्षिरसागर, बालाजी क्षिरसागर, मुमताज पटेल, सय्यद मोहसीन, जुबेर काजी, संतोष कल्याणकर, किशोर शहाणे आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post