स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे 'दुहेरी' यश

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे 'दुहेरी' यश

जुन्नर पुणे तालुका प्रतिनिधी संदीप शितोळे..

गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेल्हे नंबर-१ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या 'एन.एस.एस.ई.' (NSSE) आणि 'मंथन' परीक्षांच्या निकालात शाळेने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
        शाळेतील विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू विकासासाठी मंथन, ऑलिंपियाड, बी.टी.एस. आणि एन.एस.एस.ई. यांसारख्या परीक्षांचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावर्षीच्या निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे:
एन.एस.एस.ई. परीक्षा (राज्य गुणवत्ता यादी):
आरोही अजिंक्य भालेराव (196/200)
नित्या रमेश भालेराव (192/200)
स्वराली राहुल कोकणे (190/200)
एन.एस.एस.ई. (जिल्हा गुणवत्ता यादी):
आलिया अमीर सय्यद (180/200)
ऋत्वी निवृत्ती बांगर (176/200)
यशश्री सचिन बनकर 
(166/200)

       मंथन परीक्षेमध्ये  कु. मनस्वी पंकजकुमार जैसवार-इयत्ता पहिली 114/150
​  कु. क्षितिजा सुनील थोरात-इयत्ता दुसरी110/150
​  कु. आरोही अजिंक्य भालेराव 268/300
 कु. आलिया अमीर सय्यद 258/300
 कु. ऋत्वी निवृत्ती बांगर 246/300 इयत्ता तिसरी या विद्यार्थिनींनी यश संपादन केले.या यशाबद्दल जुन्नर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय राजेंद्र पिंगट यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा  गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना पिंगट यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रगतीचे विशेष कौतुक केले.
यशाचे शिलेदार आणि अतिरिक्त सराव करून घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. नूरजहाँ पटेल, सौ. प्रविणा नाईकवाडी, सौ. मिरा बेलकर, श्री. संतोष डुकरे, श्री. हरिदास घोडे, श्री. अशोक बांगर, श्री. रोहिदास साळवे आणि सौ. सुषमा गाडेकर , श्रीम. अंजना चौरे यांचेही कौतुक केले.
     तसेच स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने विविध सराव परीक्षांचे शाळेमध्ये आयोजन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या स्वाती कोकणे,नसरीन पठाण आणि प्रज्ञा शर्मा यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले, ज्येष्ठ सदस्य ईश्वर पिंगट, शिक्षणतज्ज्ञ विलास पिंगट , जादूगार प्रकाश शिरोळे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सखाराम शेंडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.

"शाळेतील शिस्तबद्ध सराव आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच आमच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. भविष्यातही जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेचा हा आलेख चढता ठेवेल."
— श्री. सखाराम शेंडकर (मुख्याध्यापक)
Previous Post Next Post