हिंगणघाट येथील औषधी व्यावसायिकांचा आजचा बंद 100 टक्के यशस्वी*

*हिंगणघाट येथील औषधी व्यावसायिकांचा आजचा बंद 100 टक्के यशस्वी*
===================
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक दि.20/5/2026
===================
अखिल भारतीय औषधी संघटनेच्या वतीने आज देशभर पुकारण्यात आलेल्या बंदला हिंगणघाट शहरातील औषधी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० टक्के दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला.

ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या ड्रग अॅक्ट १९४० व नियम १९४५ चे पालन न करता अनैतिक व बेकायदेशीर पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप औषधी व्यावसायिकांनी केला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला आवश्यक कायदेशीर सुधारणा व निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. मात्र, अद्यापही केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने औषधी व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आजच्या बंदमध्ये हिंगणघाट येथील सर्व औषधी दुकानदारांनी शंभर टक्के सहभाग घेतला. यावेळी व्यावसायिकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा. आकाश अवतारे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Previous Post Next Post