*जळगाव पंचायत समितीत मोठी कारवाई : दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यमुक्त*
जळगाव जिल्हा विभागीय उपसंपादक फिरोज तडवी
*पंचायत समिती जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना असमाधानकारक कामकाज, घरकुलांची अपूर्ण कामे तसेच वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्याने कार्यमुक्त करण्याचे आदेश कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा. चंद्रकांत बोंडरे सो. यांनी काढले आहेत.*
*जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या पत्रानुसार श्री. योगेश जनार्दन सपकाळे व श्री. योगेश राजेंद्र पाटील या दोन्ही अभियंत्यांकडे सोपविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमधील कामकाजाबाबत अनेक तक्रारी व नाराजी व्यक्त करण्यात आली होती. वारंवार सूचना देऊनही कामात अपेक्षित सुधारणा दिसून न आल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.*
*दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारनंतर दोन्ही अभियंत्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार इतर ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडे सोपविण्यात आला आहे.*
*या आदेशामुळे पंचायत समितीतील कामकाजात शिस्त व जबाबदारीबाबत प्रशासन गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.*

