पोलिस भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव – उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..! देताना, हिंगणघाट नगर परिषद च्या नगराध्यक्षा. नयना तुडसकर मैडम

पोलिस भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव – उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा..! देताना, हिंगणघाट नगर परिषद च्या नगराध्यक्षा. नयना तुडसकर मैडम 
.......................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 
......................................
नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेमध्ये विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर येथे शिक्षण घेत असलेले कु. ऋषिकेश किरण मुळे व कु. प्रणय शंकरराव आत्राम यांची नागपूर शहर पोलिस दलात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर मिळवलेले हे यश निश्चितच इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे. समाजसेवा, शिस्त आणि राष्ट्रसेवेची भावना जपत त्यांनी निवडलेली ही वाट अत्यंत अभिमानास्पद आहे.

युवा पिढीने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा आणि सेवाभिमुख क्षेत्रांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत स्वतःचे ध्येय निश्चित करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील सेवाकालासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
Previous Post Next Post