हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती चा मोठा उपक्रम
................................
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
................................
धान्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून, खरिप हंगामाच्या पूर्वतयारीमुळे शेतकऱ्यांची बाजारात वर्दळ वाढली आहे. रखरखत्या उन्हामुळे शेतकरी, हमाल, व्यापारी, अडते आणि मापारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने बाजार समिती प्रशासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दररोज सुमारे दोन हजार नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडगार कैरी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. उन्हाच्या तीव्रतेत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, अनेकांनी याचे स्वागत केले आहे. कैरी पाणी पिल्यानंतर जणू काही अमृत मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बाजार समितीचे हिंगणघाट बाजार समिती कर्मचारी आणि युवा अडते शिस्तबद्ध पद्धतीने कैरी पाण्याचे वाटप करत आहेत. या उपक्रमामुळे बाजार समितीची शेतकरी हिताची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. या उपक्रमासाठी बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी पुढाकार घेतला असून, पुढील एक महिन्यापर्यंत हा निशुल्क उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही एक रुपयात जेवण यांसारखे शेतकरीहिताचे उपक्रम राबवणाऱ्या हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांच्या आरोग्याची आणि सुविधांची काळजी घेत असल्याचे या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

