दहिगाव येथे रोटावेटर काम करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकात येवुन तरूणाचा दुदैवी अंत सर्वत्र हळहळ

दहिगाव येथे रोटावेटर काम करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकात येवुन तरूणाचा दुदैवी अंत सर्वत्र हळहळ

( रविंद्र आढाळे जिल्हा प्रतिनिधी)

 तालुक्यातील दहिगाव येथील २७ वर्षीय तरुणाचा रोटावेटर करीत असताना ट्रॅक्टरच्या पुढील चाकात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २३ रोजी दुपारी घडली तरुणाचे लग्न चार जून रोजी पार पडणार होते मात्र लग्नाआधीच त्याला मृत्यूने कवटाळले असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत यावल पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. दहिगाव येथील योगेश यशवंत पाटील वय 28 हा आज दिनांक २३  रोजी बबलू उर्फ शोभराज रमेश महाजन यांचे मोहराळे शेतात ट्रॅक्टर ने रोटावेटर करण्यासाठी केला होता रोटावेटर करीत असताना त्याचा अचानक तोल जाऊन तो ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून रोटावेटर मध्ये अडकून जागीच ठार झाला. ट्रॅक्टर सुरू असूनच ते सरळ शेजारील शेतात जाऊन पोहोचले हे दृश्य त्याच शेतात निंबा खाली बसलेल्या एका तरुणाने बघितले आणि तो त्या दिशेने धावत गेला व ट्रॅक्टर बंद केले. तत्काळ त्याने त्याच्या वडिलांना भ्रमण दूरध्वनीवरून संपर्क केला त्याचे वडील व नातेवाईक त्वरित तिथे दाखल झाले आणि त्याला त्या परिस्थितीत यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले याबाबतची खबर यावल पोलिसात  राजेंद्र यशवंत पाटील यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, मयत योगेश पाटील याचा विवाह दहा दिवसा वर येऊन ठेपला होता १८ जून रोजी त्याचा विवाह पार पडणार होता पण काळाने त्याच्यावर झडप मारल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी व सहकारी करीत आहेत.
Previous Post Next Post