कुंडी येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन; परिसरातील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार*पालकमंत्री मेघना दीदी साकोरे- बोर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश; १ कोटीं च्या विकास कामाचा कार्यारंभ*

कुंडी येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन; परिसरातील शेतीचा पाणीप्रश्न सुटणार
*पालकमंत्री मेघना दीदी साकोरे- बोर्डेकर यांच्या प्रयत्नांना यश; १ कोटीं च्या विकास कामाचा कार्यारंभ*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.
९५२७३०३५५९-
——————————

तालुक्यातील कुंडी येथे कसुरा नदीवर जल संधारण महामंडळांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या प्रकल्पासाठी राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना ताई साकोरे-बोर्डेकर यांनी विशेष पाठपुरावा करून सुमारे १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. 
या बंधाऱ्यामुळे परिसरातील सिंचनाचा आणि पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ.आशिषजी डख, सेलू पंचायत समितीचे सभापती गजानन (पप्पू) डोंबे, अजित मोगल, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा परभणी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कसुरा नदीवर होणाऱ्या या बंधाऱ्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार तसेच जलसंधारण महा मंडळाच्या माध्यमातून होणारा हा १ कोटींचा खर्च गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपाद यावेळी अनेक  मान्यवरांनी यावेळी केले. पालकमंत्र्यांच्या दूरदृष्टी मुळे या भागातील प्रलंबित पाणीप्रश्न सुटल्या बद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र काकासाहेब मोगल, माजी सरपंच अंकल मोगल, संजयजी थोरात, पांडूरंग काका मोगल,गजू भाऊ मोगल, शिवाजीराव मोगल, राजेशजी मोगल, सुरेशराव मोगल, सोमेश्वर मोगल, अक्षय थोरात, ऋषी मोगरे यांच्यासह कुंडी गावाती ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी आणि युवातरुण यावेळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.



***

प्रतिक्रिया,
"शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी जलसंधारण ही काळाची गरज आहे.या बंधाऱ्यामुळे कुंडी परिसरातील शेतीला नवसंजीवनी मिळेल आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून गावाचा विकास साधला जाईल."
— अजित मोगल,भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा परभणी
Previous Post Next Post