*वाळूची ने आण करणाऱ्या टिप्परने महिला सरपंच यांच्या पतीला उडवले*.

*वाळूची ने आण  करणाऱ्या टिप्परने महिला सरपंच यांच्या पतीला उडवले*. 


मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
९५२७३०३५५९-
———————————
गेल्या काही दिवसापासून पूर्णा परिसरातील नदी पात्रातून वाळूचा उपसा राजरोस पणे करुन रात्री बे- रात्री टिप्परने वाळू  वाहुन नेणाऱ्या वाळू विक्रेत्यांनी मोठा हैदोस घातला असून भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने तालुक्यातील संदलापुरच्या महिला सरपंचाच्या पतीला उडविले असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.या घटने नंतर संतप्त जमावाने टिप्पर जाळून टाकले असून टिप्पर चालकाला पोलीसांनी अटक केली असली तरी गावात तणावपूर्ण शांतता पसरली. 
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व गावात गोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावच्या महिला संरपच रुक्मिणीबाई यांचे पती पंडित बाळासाहेब म्हात्रे वय 50 वर्ष रा.संदलापुर ता.पुर्णा असे मयताचे नाव आहे.
मंगळवारी 12 मे 2026 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बदलापूर गावाजवळील पूर्णा नदी पात्रातून वाळू भरून जाणारा टिपर क्रमांक 43 यु २८५० हा गावातून भरधाव वेगाने जात असताना पंडित म्हात्रे हे किराणा दुकानावरून सामान घेऊन घराकडे पायी येत असताना टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की पंडित मात्रे यांचा जागेवर मृत्यू झाला घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली संतप्त गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटना स्थळाकडे घाव घेऊन संतापाच्या भरात गावकऱ्यांनी अपघात  ग्रस्त टिप्परला आग लावून पेटवून दिले या आगीत टिपरचीची केबिन जळून खाक झाली यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तसेच इतर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत टिप्पर चालक योगेश कांबळे यास अटक केली असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सध्या गावात तान तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे मयत पंडित म्हात्रे यांच्या पश्चात पत्नी. दोन मुले,  आई  वडील, भाऊ, असा परिवार आहे
Previous Post Next Post