सगरोळीत रेती ट्रकच्या धडकेत तरुणाचा चिरडून मृत्यू

सगरोळीत रेती ट्रकच्या धडकेत तरुणाचा चिरडून मृत्यू 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे भरधाव वेगाने जात असलेल्या रेती वाहतूक करणारा ट्रक तरुणांना धडक देऊन त्याचा चिरडून मृत्यू झाला सध्या बिलोली तालुक्यामध्ये सगरोळी, गंजगाव, व बोळेगाव, या ठिकाणी रेती वाहतूक करण्यासाठी कर्नाटक व बिदर व महाराष्ट्रातुन हायवा टिप्पर च्या साह्याने रेती वाहतूक जोमात सुरू असून हवा ड्रायव्हर यांना कशाचीच भीती नसल्यासारखे वागत आहेत खेडोपाडी ग्रामीण भागांमधील छोटेसे रस्ते असल्यामुळे सायकल मोटर व पायी चालत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात जीव मोठीत धरून रोडच्या कडेने चालावे लागत आहे मी आताच आज सकाळी सगरोळी येथील विठ्ठल लवटे वय 45 राहणार अनुसया नगर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून तो सकाळी रस्त्याच्या कडेने पायी चालत असताना भारधाव वेगाने रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली व त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला या मृत्यूमुळे सर्व नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून हायवा व टिप्पर गाडीचा वेग कमी करून चालवतील का व आणि किती जणांचे जीव घेतील हा प्रश्न या ठिकाणी नागरिकात संभ्रम करत आहे त्यामुळे या हयवा व टिप्पर वरती आळा घालण्यासाठी आरटीओने दखल घ्यावी व त्यांच्याकडे लायसन्स आहेत का हे तपासावे व गाडीचे कागदपत्र व्यवस्थित आहेत का याची जाणीव करून हायवांना व टिप्पर यांना वाहतुकीचे परवानगी द्यावी असे नागरिकांतून मागणी होत आहे व विठ्ठल लवटे यांच्या  मृत्यूप्रकरणी ट्रक ड्रायव्हर फरार असून पुढील कारवाई शासकीय आदेशानुसार पोलीस निरीक्षक रोकडे साहेब पोलीस उपनिरीक्षक देगलूरकर साहेब सहाय्यक उपनिरीक्षक आंबेवार साहेब व कमलाकर साहेब यांच्या नेतृत्वात पुढील तपास चालू आहे
Previous Post Next Post