*मिनी मंत्रालय असुविधेच्या विळख्यात*
परभणी मानवत जिल्हा विभागीय संपादक ( अनिल चव्हाण )
*————{भाग पहिला}*
परभणी जिल्हातील विविध कामे एकाच छत्राखाली व्हावी म्हणून मिनी मत्रालय समजल्या जाणार्या जिल्हा परिषदेची निर्मिती करण्यात आली.
जिल्हात शासकीय कार्यालय वेग वेगळ्या भागात होती. ती सर्व एकाच ठिकानी असावी म्हणून राज्य सरकारने मोठा निधी खर्च Cbse चार (४ ) मजली भव्य अशी जिल्हा परिषदेची अध्यावत इमारत उभी राहिली पण आज ही मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जिल्हा परिषद ईमारतीमध्ये सुविधेचा अभाव असल्यामु ईमारत असुविधेच्या विळख्यात सापडली असल्यामुळे सामान्य नागरिकामधून संताप व्यक्य होतांना पाहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की
परभणी जिल्हातील *परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ,पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर,* या तालूक्यातील महसूल, शैक्षणिक, कृषि, समाज कल्याण, पंचायतराज, ग्रामिण विकास, आदीचा आराखडा निर्माण करून जिल्हाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी अध्यावत जि.प.च्या ४ मजली ईमारतीची निर्मिती केली.
पण हि ईमारत असूविधेचे माहेर घर बनत असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होतांना दिसत आहे.
मिनी मंत्रालयातील अधिकारी व लोक प्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याचे जाणवत आहे.
जिल्हाचे भोगोलीक क्षेत्र चांगले असून जिल्हात सुपीक जमीण व गोदाकाठ सुजलम सुफलम् करणारा असून ही भाग सुपीक असून हि लोक प्रतिनिधीचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भाग अनेक समस्यानी ग्रस्त झाला आहे.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधीचे यांचे समन्वय नसल्यानेच जिल्हा परिषदेची भव्य चार मजली असलेले मिनी मंत्रालय सुध्दा असुविधेच्या विळख्यात सापडले आहे.
*असुविधा.*
१) भव्य ईमारती मधिल प्रत्येक कार्यालयात ये जा करण्यासाठी अध्यावत (०४ ) भारवाहक लिप्ट मोठा निधी खर्च करून उभारण्यात आल्या असून त्या अजून *बंद* आहे.
त्यामुळे नागरिकासह कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी दिव्यांग यांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे.
*(२)* प्रत्येक विभागात साहित्याची व्यवस्थित माडणी नसून अस्तव्यस्त पसारा पडला आहे.
*(०३)* जल है तो कल है हे ब्रिद असून ही जनतेला पिण्यासाठी फ्रिजर नाही.
*(०४ )* कामासाठी आॅफिसला बाहेर गावावरून येणार्या नागरिकासांठी बैठक व्यवस्था नाही.
*(०५ )* स्वच्छता गृहातील अनेक पाईप लिक झाले आहे.
*(०६ )* अनेक अतिशय महत्वाची कागदपत्रे फाईल पायरीवर अस्तव्यस्त फेकून दिले आहे.
*(०७ )* अधिकारी व कर्मचारी खूर्चीवर दिसत नसल्याने कामाचा खेळखंडोबा होतांना दिसत आहे.
*(०८ )* मिटिंगच्या नावाखाली सामान्याची गळचेपी होत असल्याने कामास विलंब लागतांना दिसत आहे.
त्यामुळे मिनी मंत्रायल अनेक समस्यांच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होतांनी दिसत आहे.
याकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
****

