मानवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन टिप्पर सह अवैध वाळू जप्तपो.नि.संदीप बोरकर पाटील यांच्या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ———

मानवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई : दोन  टिप्पर सह अवैध वाळू जप्त
पो.नि.संदीप बोरकर पाटील यांच्या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ

———
————————

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.

मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध  वाळू उपसा व वाहतुकी विरोधात मानवत पो.स्टेचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई करण्यात आली त्यामुळे वाळूचीराजरोस पणे तस्करी करणार्‍याचे ढाबे दणाणले. 
या कारवाई मध्ये  गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर (डंपर )  जप्त करण्यात आले असून तब्बल *१० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल* हस्तगत करण्यात आला. 

याबाबत मानवत पोलीस ठाण्यात तक्रार क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई महेश दत्ताराव रणेर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, दि. २२ मे २०२६ रोजी दुपारी २.११ वाजण्याच्या सुमारास रामपुरी बु. येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरीत्या वाळू ( रेती )  उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मानवत पोलिसांनी छापा टाकून दोन वाहनांसह दोन वाळू तस्कर  आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपी मुंजाजी बालासाहेब माने (रा. सिंगणापूर, ता. जि. परभणी) व संतोष लिंबादास सुकरे (रा. वडगाव सुके, ता. जि. परभणी) यांच्याविरुद्ध मानवत पो.स्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आरोपी हे गोदावरी नदी पात्रातील वाळू (रेती ) त्यांच्या ताब्यातील वाहनात भरून चोरट्या मार्गाने विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाचा टाटा टिप्पर ( डंपर ) (क्रमांक MH 12 HD 1669) व एक लाल रंगाचा टाटा टिप्पर ( डंपर ) (क्रमांक MH 12 DG 7444) तसेचवाळू ( रेती ) असलेला मुद्देमाल एकूण १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक घोरपडे हे करत आहेत. मानवत पोलिसांनी केलेल्या या *धडक* कठोर कारवाई मुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले असून नदी पात्रातून  अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यां तस्करामध्ये खळबळ उडाली आहे.
Previous Post Next Post