23 तारखेला लोहा येथील जण आक्रोश मोर्चेत बिलोली तालुक्यातील ओ.बी.सी. व बोद्ध समाज हजारोच्या संख्येने सामील होणार - गजानन चिंतले

23 तारखेला लोहा येथील जण आक्रोश मोर्चेत बिलोली तालुक्यातील ओ.बी.सी. व बोद्ध समाज हजारोच्या संख्येने सामील होणार - गजानन चिंतले

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :जायकवाडी कॅम्प, ता. लोहा, जि. नांदेड येथे पंचशील ध्वज व बौद्ध विहाराच्या जागेवरील नामफलक हटवून झालेल्या विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ २३ जून रोजी काढण्यात येणाऱ्या अक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर  तालुका बिलोली येथून हजारो च्या संख्येने ओ.बी.सी. व बोद्ध बांधव सामील होणार असे आव्हान वंचित बहुजन आघाडी मा.तालुका महासचिव गजानन चिंतले यांनी आव्हान केले आहे 
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी महाजन प्रमुख मार्गदर्शना खाली जायकवाडी कॅम्प येथे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. पंचशील ध्वज व बौद्ध अस्मितेशी संबंधित प्रतीकांचा झालेला अवमान हा संपूर्ण बौद्ध समाजाच्या भावना दुखावणारा असून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच २३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या अक्रोश मोर्चात सर्व ओ.बी.सी समाजबांधव, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गजानन चिंतले यांनी केले. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला
Previous Post Next Post