काँग्रेसचा २३ रोजी आसूड मोर्चा; जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा : खा. चव्हाण.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विशेष उपस्थितीत शेती व शेतकरी यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात व विविध मागण्यांसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने २३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येणार असून यादरम्यान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याची माहिती खासदार तथा दक्षिण जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी दिली आहे. दरम्यान बुधवार (ता.१७) रोजी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत एसआयआर मोहीमेसह मोर्चा व पदग्रहण सोहळ्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. ऐन पेरणीच्या काळात देखील सरकारच्या वतीने शेतकरी विरोधी धोरणे राबविण्याचे, थट्टा करण्याचे काम सुरु आहे. यामुळेच शेती व इतर मागण्या घेऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विशेष उपस्थितीत दि. २३ जून रोजी काँग्रेसच्या वतीने आसूड मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खा. रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान आसूड मोर्चात शेतकरी वर्गासह सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफ्फार यांनी आढावा बैठकीत दिली आहे. यावेळी माजी आ.
हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, डॉ श्रावण रॅपणवाड, सुरेंद्र घोडजकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, आनंद चव्हाण, तिरुपती कोंढेकर, अनिल मोरे, श्रीनिवास मोरे, गोविंद बाबा गोंड, मधूकर दिघे, संजय कऱ्हाळे, प्रताप देशमुख बारडकर, राजू पाटील रावनगावकर, सुरेश हाटकर, कुमार कुर्तडीकर, संदिपकुमार देशमुख, विलास पावडे, संदिप देशमुख तरोडेकर, बापूसाहेब पाटील, गणेश ढगे, संजय वाघमारे, दिपकसिंग हुजुरीया, धनंजय उमरीकर आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

