देगलूर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी :
गहाळ झालेले 25 मोबाईल शोधून मालकांना परत
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड
देगलूर पोलीस स्टेशनने नागरिकांचे हरठलेले मोबाईल शोधण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत 25 गहाळ मोबाईल फोन शोधून त्याच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किमत ₹3,74,500/-(तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये) इतकी आहे नादेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार (भा.पो से) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत गोसावी याच्या सूचनानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यमोहन बोलमवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 15 दिवसाच्या आत गहाळ मोबाईल प्रकरणाचा आढावा घेत तांत्रिक तपासाला गती दिली. CEIR पोर्टल, IME) ट्रैकिंग तसेच विविध मोबाईल सेवा प्रदात्याकडून प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला या कारवाईमध्ये मोबाईल शोध पथकाचे पो हे करें. 580 के जी तलवारे यानी विशेष परिश्रम घेतले तसेच देगलूर पोलीस स्टेशनच्या डी.जी. पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करुन मोबाईल हस्तगत करण्यासाठी मोलाची मदत केली. त्याच्या अथक प्रयत्नामुळे विविध ठिकाणाहून मोबाईल शोधून काढण्यात यश आलेया मोहिमेत ओप्यो, व्हियो, रियलमी, सैमसंग, रेडमी, मोटोरोला, टेक्नी, लावा आदी कंपन्याचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. आवश्यक पडताळणी पूर्ण करून संबंधित फिर्यादीना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. या वर्शस्वी कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून आधुनिक तंत्रज्ञालाचा प्रभावी वापर करून गहाळ मालमत्ता शोधण्यामध्ये देगलूर पोलिसानी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक श्री. सूर्यमोहन बोलमवाड, मोबाईल सोध पथकाचे पो हे कॉ. 580 के जी. तलवारे तसेच डीबी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे

