पुलगाव नगरपरिषदेत भाजपची हुकूमशाही की सत्तेसाठी आलेली लाचारी? पुलगावची जनता विचारतेय जाब! ​

पुलगाव नगरपरिषदेत भाजपची हुकूमशाही की सत्तेसाठी आलेली लाचारी? पुलगावची जनता विचारतेय जाब! 
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक 

​पुलगाव नगरपरिषद येथे जनतेने एका हाती काँग्रेस पक्षाला सत्ता दिली आहे. इथे भाजपला नेहमीप्रमाणे पैशांचा बाजार मांडून नगरसेवक विकत घेता आले नाहीत, म्हणूनच हा सगळा वैफल्यातून आलेला राग आणि सत्तेची मस्ती सभागृहात काढली जात आहे का? असा थेट प्रश्न आता पुलगावची जनता विचारत आहे!
​काल २९ जून २०२६ रोजी झालेल्या सभेत जे काही घडले, ते अत्यंत निंदनीय आहे.
​काय घडलं नक्की सभेत?
​नगराध्यक्ष मॅडमची समजूतदार भूमिका: नगराध्यक्ष मॅडम यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना स्पष्ट सांगितले की, "पहिले ठरलेली मीटिंग पूर्ण करूया, ती कंटिन्यू होऊ द्या; त्यानंतर तुमचे जे काही मुद्दे असतील, त्यावर आपण सविस्तर चर्चा करूया."
​भाजपचा हेकटपणा आणि दादागिरी: परंतु, भाजपच्या लोकांचा हेकटपणा बघा! त्यांचा हेतू चर्चा करण्याचा नव्हताच. त्यांचे म्हणणे होते की, "मीटिंग थांबवून द्या आणि आम्ही म्हणतोय त्याच मुद्द्यांवर आधी बोला!"
​गावच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही: जी मीटिंग संपूर्ण गावच्या हितासाठी आणि विकासासाठी आयोजित केली होती, ती या भाजपच्या नगरसेवकांनी उधळून लावली. यांना गावच्या विकासाशी काडीचेही देणेघेणे नाही! यांना फक्त स्वतःचा फायदा कुठे होतोय, यातच रस आहे. "माझं काम होत नाहीये, माझं काम होत नाहीये" एवढाच एक कलमी अजेंडा घेऊन हे लोक सभागृहात गोंधळ घालत आहेत.
​⚖️ तक्रार दाखल... आता कारवाई होणार की राजकीय दबावाखाली दाबणार?
​या संतापजनक प्रकारानंतर नगराध्यक्ष मॅडम, सर्व अपक्ष नगरसेवक आणि इतर सर्व पक्षांच्या सदस्यांनी एकत्र येऊन पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी (Collector) कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.
​पण आता प्रश्न हा निर्माण होतोय की, या हुकूमशाही वृत्तीच्या लोकांवर खरोखर कायदेशीर कारवाई होणार की 'वरच्या कामदार साहेबांचा' एक फोन येईल आणि ही कारवाई नेहमीप्रमाणे दाबून टाकली जाईल? जर सत्तेच्या बळावर ही कारवाई थांबवली गेली, तर लोकशाहीचा खून होईल!
​ पुलगावचा विकास हे लोक होऊ देणार नाहीत!
​ज्या पद्धतीने भाजपचे नगरसेवक वागत आहेत, ते पाहता हे लोक पुलगाव शहराचा विकास कधीही होऊ देणार नाहीत, अशी भीती आता प्रत्येक नागरिकाला वाटू लागली आहे. कामाच्या नावावर सभागृहात कचरा फेकणाऱ्या या प्रवृत्तीला आता जनतेच्या दारात धडा शिकवण्याची वेळ आली आहे!
​युवासेना या संपूर्ण प्रकाराचा आणि भाजप नगरसेवकांच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करत आहे!
Previous Post Next Post