नाकाबंदी वेळी ट्रक मध्ये सापडलेल्या अल्पवयीन मुलीस यावल पोलिसांनी तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२५
यावल पोलिसांनी मंगळवार दि.
२३ रोजी रात्री बऱ्हाणपूर अंकलेश्वर या राज्य मार्गावर केलेल्या नाकाबंदी दरम्यान चोपड्याहून यावलकडे येणाऱ्या एका ट्रक मध्ये एक अल्पवयीन १७ वर्षीय मुलगा आणि एक अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी आढळून आली होती.हे अल्पवयीन मुलं आपण प्रेमी युगल असल्याचे सांगत होते.व ट्रक चालक हा मद्यधुद अवस्थेत होता.तेव्हा ट्रकचालक आणि हे दोन अल्पवयीन असे तिघेच या ट्रकमध्ये असल्याने पोलिसां संशय आल्याने ट्रक ताब्यात घेतला. आणि सदर अल्पवयीन मुलगीच्या कुटुंबास माहिती दिल्यानंतर दि. २५ जून गुरूवारी मुलीस सुखरूप तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.यावल पोलिसांच्या रात्रीच्या गोष्टीमुळे आणि समय सुचकता आणि दक्षता बाळग ल्याने अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांकडे परत गेली आहे
चोपड्याकडून यावल कडे येणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे,पोलीस हवालदार एजाज सलीम गवळी, हवालदार अर्षद कासम गवळी, वरिष्ठ फलटण नायक पंकज फिरके,पोलीस वाहन चालक ज्ञानेश्वर सपकाळे हे नाकाबंदीवर असताना मध्यरात्रीनंतर ट्रक क्र. जी.जे.१० टी.व्ही.७३२३ हा भरधाव वेगात यावल शहराच्या दिशेने येत होता.त्याला पथकाने थांबवले व ट्रक चालक अमोल शंकर जयप्रकाश पांडे रा.भगवानपूर,बिहार हा मद्यधुंद अवस्थेत होता.व तो पोलिसांना संशयास्पद उत्तरं देत होता.आणि वाहनात कोणीच नाही असे तो बोलू लागला,तेव्हा वाहनात काहीतरी असावे या हेतूने पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि त्याच्या ट्रकची झडती घेतली असता यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील उपरखेड येथील एक १७ वर्षीय मुलगा आणि त्याच्या सोबत अभनपुरा बुद्रुक, ता. शहादा जि. नंदुरबार येथील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी होती.पाेलिसांनी दोघे अल्पवयीन व ट्रक चालकास ताब्यात घेतले होते व मुलीच्या पालकांनी माहिती देण्यात आली होती तेव्हा गुरूवारी मुलीचे आई,वडील पोलिस ठाण्यात आले असता अल्पवयीन मुलीस त्यांच्या सुपूर्त करण्यात आले.तेव्हा मुलगी सुखरूप परत मिळाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
अशी झाली ओळख व मुलीच्या गावातुन केले पलायन.
अल्पवयीन मुलगी तिच्या मावशी कडे होती व मावशीचे कुटुंब चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ऊस तोड करीता गेले होते. तेथे उपरखेड ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील कुटुंबासह ऊसतोड करीता आला होता.तेथे दोघांची ओळख झाली होती आणी २३ जुन राेजी हा मुलगा अभनपुरा बुद्रुक या गावात गेला व तेथुन दोघे शिरपूर येथे आले व नंतर वरील ट्रक मध्ये बसुन ते भुसावळला जात होते.
प्रसंगी मोठ्या गुन्ह्याची भीती.
प्रचंड दारूच्या नशेत हा चालक होता.अशात चांगलं वाईट कळत नाही.दोघं अल्पवयीन असल्याने प्रसंगी मोठा गुन्हा देखील घडू शकला असता,तेव्हा परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चालकाला देखील ताब्यात घेतले व या अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.मुलास देखील त्याच्या नातेवाईकास सोपवले आहे असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.

