आई उर्फ माता मंदिर माता मंदिर वार्ड हिंगणघाट परिसरातील शतकपूर्ती गाठलेल्या पवित्र पिंपळ वृक्षास "हेरिटेज (वारसा) वृक्ष" घोषित करून संरक्षण देण्याची मागणी आई उर्फ माता मंदिर देवस्थान तर्फे न.पा. ला करण्यात आली आहे

आई उर्फ माता मंदिर माता मंदिर वार्ड हिंगणघाट परिसरातील शतकपूर्ती गाठलेल्या पवित्र पिंपळ वृक्षास "हेरिटेज (वारसा) वृक्ष" घोषित करून संरक्षण देण्याची मागणी आई उर्फ माता मंदिर देवस्थान तर्फे न.पा. ला करण्यात आली आहे 

(वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

 माता मंदिर परिसरात उभा असलेला प्राचीन पिंपळ वृक्ष हा केवळ एक वृक्ष नसून शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय वारशाचे प्रतीक आहे. अंदाजे शंभर वर्षांहून अधिक जुना असलेला हा भव्य वृक्ष आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून दररोज अनेक नागरिक या वृक्षासमोर नतमस्तक होऊन पूजा-अर्चना करतात.
सदर वृक्षाने अनेक पिढ्या पाहिल्या असून शहराच्या इतिहासाचा तो एक जिवंत साक्षीदार आहे. या वृक्षामुळे परिसरातील जैवविविधतेला आश्रय मिळतो, पक्ष्यांचे निवासस्थान निर्माण होते तसेच पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होते. वाढते शहरीकरण, बांधकामे व इतर मानवी हस्तक्षेप यांमुळे अशा प्राचीन वृक्षांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याने त्यांचे विशेष संरक्षण करणे आवश्यक आहे.
म्हणून माता मंदिर येथील या शतकपूर्ती गाठलेल्या पवित्र पिंपळ वृक्षाला हिंगणघाट शहराचा "हेरिटेज (वारसा) वृक्ष" म्हणून घोषित करण्यात यावे. तसेच त्याच्या संरक्षणासाठी माहिती फलक लावणे, संरक्षक कुंपण उभारणे व नियमित देखभाल करण्याची व्यवस्था करावी, अशी जनतेची व आई उर्फ माता मंदिर देवस्थान समिती ची मागणी आहे. 
 
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post