देगलूर तालुक्यातील घरकुल घोटाळा प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे आदेश
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : देगलूर तालुक्यातील घरकुल योजनेतील मोठ्या प्रमाणात होत असलेले, घरकुल योजना घोटाळा भ्रष्टाचाराबाबत चौकशी, करून संबंधित अधिकाऱ्यावर कटोर कारवाई करण्याबाबत,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र फरसे रा .तमलूर ता देगलूर राजेंद्र गंगनर रा तमलूर यांनी गोरगरिबांच्या,घरकुलाच्या होणाऱ्या लुटेबाबत अनेक वेळा पंचायत समिती देगलूर येथे तक्रारी दाखल करून सुद्धा, संबंधित अधिकारी तक्रारीची दखल न घेता परस्पर मिली भगत ग्रामपंचायत कार्यालय पासून ते विस्तार अधिकारी,व घरकुल इंजिनियर यांनी घरकुल पास करण्यासाठी, व हप्ते टाकण्यासाठी परस्पर प्रत्येक व्यक्तीकडून, अंदाजे 12000 ते 15 हजार रुपये पर्यंतचे लाच रोख रक्कम रुपये, मागितली जात असल्याची तक्रार प्रशासनाच्या नजरेसमोर आणून ठेवली,व संबंधित अर्जावरती कारवाई न केल्यामुळे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसले असता, देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांची घरकुल घोटाळ्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाने घेतली,असून देगलूर तालुक्यातील घरकुल योजना मध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्याकडून आर्थिक शोषण व होत आहे त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही, कारवाई होत नसल्याने संबंधित गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, घरकुल अभियंते यांची, उच्चस्तीय य चौकशी व तात्काळ कारवाई, करण्याबाबत जिल्हा परिषद कार्यालय नांदेड यांना सूचना मंत्रालयातून करण्यात आले आहेत,श्री रवींद्र मारोती फरसे व श्री राजेंद्र गंगनर राहणार तमलूर ता देगलूर जी नांदेड यांनी, महाराष्ट्र मंत्रालय ग्रामविकास यांना दिनांक 17/ 6/ 2026 रोजी निवेदन सादर केली आहे अर्जदाराच्या, मागण्या देगलूर तालुक्यातील घरकुल योजना ची उच्चस्तरिय चौकशी करण्यात यावी, संबंधित अभियंते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची, निष्पश्य चौकशी करण्यात यावी,लाभार्थ्यांचे जबाब नोंदवून आर्थिक व्यवहाराची पडताळणी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ प्रशासकीय कायदेशीर कारवाई करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यमुक्त अथवा निलंबित करण्याबाबत विचार करण्यात यावा अशा, प्रकारे ग्रामीण भागामध्ये घरकुलाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याची धमक देणारे सामाजिक कार्यकर्ते,असायलाच पाहिजे आणि ही ग्रामीण भागातील देगलूर तालुक्यातून सुरुवात झालेली आहे, यामुळे गोरगरीब नागरिकांमधून मात्र होणाऱ्या घरकुल योजनेच्या घोटाळ्यांबाबत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यामुळे समाधान व्यक्त नागरिक करत आहेत.

