खडकपुरा आणि निजाम कॉलनीत घाणीचे साम्रा*ज्य; नागरिकांचा तीव्र संताप...दोन दिवसांत नाल्यांची सफाई न झाल्यास मंगळवार पासून नगर परिषदेसमोर उग्र जन आंदोलन*

खडकपुरा आणि निजाम कॉलनीत घाणीचे साम्रा*ज्य; नागरिकांचा तीव्र संतापदोन दिवसांत नाल्यांची सफाई न झाल्यास मंगळवार पासून नगर परिषदेसमोर उग्र जन आंदोलन* 

(अकोला मुख्य जिला प्रतिनिधि इमरान खान )

 अकोला:मुर्तीजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील खडकपुरा आणि निजामुद्दीन कॉलनी परिसरात नाल्यांची सफाई न झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊनही प्रशासनाने खबरदारी न घेतल्यामुळे परिसरातील बहुतांश नाले तुंबले आहेत. परिणामी, नाल्यांमधील घाण पाणी थेट मुख्य रस्त्यांवरून आणि नागरिकांच्या घरात वाहत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या गंभीर समस्येची दखल घेत 'ए.पी.जे. अब्दुल कलाम बहुउद्देशीय संस्था' आणि स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे. तातडीने नाल्यांची सफाई करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मशिदीसमोर साचले घाण पाणीनिजाम कॉलनीतील सांडपाणी थेट समोरील मशिदीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचत आहे. यामुळे पवित्र धार्मिक स्थळाच्या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, नमाज पठणासाठी जाणाऱ्या नागरिकांना या घाणीतून वाट काढावी लागत आहे.निवडून आलेले लोकप्रतिनिधी गायब!निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारात फिरणारे लोकप्रतिनिधी आणि वॉर्डाचे नगरसेवक नागरिकांच्या या हलाखीच्या परिस्थितीत वॉर्डातून गायब असल्याचा संताप जनतेने व्यक्त केला आहे. नगरसेवकांनी स्वतः प्रभागाचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि प्रशासनावर दबाव आणून कामे करून घ्यावीत, अशी मागणी केली जात आहे.मंगळवारपासून आंदोलनाचा इशाराप्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर पुढील दोन दिवसांत नाल्यांची पूर्ण सफाई झाली नाही, तर मंगळवारपासून नगर परिषद कार्यालयासमोर उग्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासनच जबाबदार राहील.निवेदन सादर करताना ए.पी.जे. अब्दुल कलाम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद शब्बीर, जुनैद, अरबाज, बबलू, फैजान, अबू तल्हा, अरसलान, छोटू, शहजाद यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post